Private Advt

शेतात रंगला जुगाराचा डाव : पोलिसांच्या धाडीत तिघे जाळ्यात

जळगाव : मोहाडी रस्त्यावरील पाचनदेवी मंदिरासमोरील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत रोकडसह सहा दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मोहाडी रोडवरील पाचनदेवी मंदिरासमोरील शेतात काहीजण जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक सुनील चौधरी, हवालदार प्रवीण पाटील, सचिन विसपुते, कॉन्स्टेबल भरत डोके, अजय पाटील आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक निलेश गोसावी, सचिन मुंढे, नाईक समाधान टहाकळे, पोलिस कॉन्स्टेबल शुद्धोधन ढवळे यांनी संयुक्तपणे सोमवार, 11 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमार छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही पसार झाले तर तिघांना पकडण्यात यश आले.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
गजानन समाधान हटकर (35, रा.तांबापुरा), शरीफ लोहार गुलमोहम्मद (49, रा.गेंदालाल मिल), संतोष चुडामण चव्हाण (52, सामनेर, ता.पाचोरा) या तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी जुगार खेळण्याचे साहित्य, 13 हजार 500 रुपयांची रोकड आणि सहा दुचाकी जप्त केल्या.