शेतातील गोदामातून 54 हजारांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले

54,000 worth of agricultural materials stolen from a warehouse in Khandala Shiwar भुसावळ : तालुक्यातील खंडाळा शिवारातील गोदामातून चोरट्यांनी 54 हजारांचे साहित्य लांबवले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शेत मालक नसल्याची चोरट्यांनी साधली संधी
तक्रारदार शेतकरी प्रमोद तुकाराम गाजरे (64, पत्री शाळेमागे, भुसावळ) यांचे खंडाळा शिवारात शेत गट क्रमांक 317/1 क्रमांक पत्र्याचे गोदाम बांधण्यात आले आहे. या गोदामातील पाच एचपीचा डिझेल पंप, 14 हजार रुपये किंमतीचा फवारणीचा पंप, पॉवर टिलर, पेट्रोल चलित फवारणी पंप, ट्रिलर मशीनचे रोटर मिळून एकण 54 हजार रुपये किंमतीचे साहित्य 28 ते 29 रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी गाजरे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक सुभान तडवी करीत आहेत.