शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजू शेट्टी यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा

0

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बुधवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री, या निवासस्थानी भेट घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर एकत्रितपणे काम करण्याबाबत चर्चा केल्याचे कळते.

नियोजित समृद्धी महामार्गाला विरोध करणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि सध्या सुरू असलेल्या तूर खरेदीच्या मुद्यावरही उभय नेत्यांनी सुमारे दीड तास चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले.