Private Advt

शेतकर्‍याच्या बकर्‍या चाकूच्या धाकावर लांबविल्या : भडगाव तालुक्यातील घटना

भडगाव : भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे शिवारात वनविभागाच्या जागेवर राहत असलेल्या मजुरावचहू आठ बकर्‍यांसह चार बकरीच्या पिलांची चाकूच्या धाकावर जबरीने चोरी करण्यात आली. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दिवसा केली लूट
बापू खंडू पाटील (65, वलवाडी, ता.भडगाव) हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार, 24 मार्च रोजी सकाळी 11.30 ते 12.30 वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून 28 हजार रुपये किंमतीच्या चार बकर्‍या व चार पिल्ले जबरीने चोरून नेली. याप्रकरणी बापू पाटील यांनी भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात तीन जणांविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.