शेतकर्‍यांसाठी ’एक देश एक बाजार’ धोरण; मोदी सरकारचा मोठा निर्णय

3

नवी दिल्ली – अत्यावश्यक वस्तू कायदा, एपीएसी कलमातील सुधारणांना मान्यता देण्यात आली असून त्यामुळे शेतकर्‍यांना आता थेट आपला माल विकता येणार आहे. आता देशातील शेतकर्‍यांना एक देश एक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या बैठकीत यास मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त कृषी उत्पादनांच्या साठवणुकीची मर्यादा संपुष्टात आणली आहे, केवळ अत्यंत गरजेच्या परिस्थितीत हे करता येणार आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज मोदींच्या मंत्रिमंडळाची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाच्या अध्यादेशांना मंजुरी देण्यात आली आहे. मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी त्यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली.

Copy