शेतकरी मोर्च्याच्या निमित्ताने विरोधकांचे पुन्हा हातात हात; मोदींवर साधला निशाना

0

नवी दिल्ली-कर्जमाफीच्या मागणीसाठी देशातील हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. संसदेवर आज धडक मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या या मोर्चाला विरोधकांचा पाठिंबा मिळत आहे. रामलीला मैदानात एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा विरोधी पक्ष एकत्र येत सरकारवर हल्ला चढवला.

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री ‘आप’नेते अरविंद केजरीवाल, शरद यादव, सीपीआय नेते सीताराम येचूरी, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आदींनी उपस्थिती देत सरकारवर शाब्दिक हल्ला केला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी सरकारकडून गिफ्ट मागत नसून आपले हक्क मागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोगस आश्वासन देण्यात पटाईत असल्याचे आरोप केले आहे.