शेतकरी कुटुंबातील मोहीतचा अभिमान

0

नवी दिल्ली: मोहितला दिल्ली डेअरडेव्हिल्सने संधी दिल्याने मी खूप आनंद असल्याचे आणि अभिमान वाटत असल्याचे, मोहितचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी म्हटले आहे. त्याला आयुष्यात काहीही सहजरित्या मिळालेले नाही. तो शेतकऱ्याचा मुलगा असून, क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले. मोहितला देशासाठी खेळायचे आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सने  मोहितला चाचणीसाठी बोलविले आहे. मला आशा आहे, की तो त्यांना नक्कीच प्रभावित करेल. तो यष्टीरक्षकही असून, त्याची फलंदाजीची शैली उत्तम आहे, असे कौतुक भारद्वाज यांनी केले आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्रिशतक ठोकणारा मोहित अहलावतचे प्रशिक्षक संजय भारद्वाज हे भारतीय संघातील माजी खेळाडू गौतम गंभीर आणि 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद यांचेही प्रशिक्षक होते.