शेअर मार्केट कोसळले; सेन्सेक्स तीन हजारापेक्षा अधिक अंकांनी घसरले

0

मुंबई: जगभरात कोरोना हाहाकार माजवला आहे. संख्या दररोज वाढत आहे. भारतातील संख्या चारशेच्या जवळपास पोहोचली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. सर्वच व्यापार-व्यवसायाला नुकसान पोहोचत आहे. कोरोनाच विपरित परिणाम शेअर बाजारावर देखील होत आहे. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे भागधारकांकडून समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ लागली आहे. त्यामुळे आज मुंबई शेअर मार्केटचा सेन्सेक्स तीन हजारांहून अधिक अंकांनी तर निफ्टीही खाली आला आहे.

आज दिवसाच्या सुरुवातीलाच सेंसेक्स 2307.16 अंकांनी कोसळला. तर तर निफ्टी 8.66 टक्क्यांनी कोसळला. शेअर बाजारातील 150 शेअर्सनी लोअर सर्किट गाठले. त्यामुळे शेअर बाजारातील व्यवहार जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक काळासाठी बंद ठेवण्यात आले होते. पुन्हा सुरू झाल्यावर शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी पडझड झाली. त्यामुळे 3149.86 अंकांनी घसरून 26 हजार 766.10 पर्यंत खाली आला, तर निफ्टी 7945.70 अंकांपर्यंत खाली आला.

Copy