शेअर बाजारात घसरण कायम; आजही मोठी घसरण

0

मुंबई: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून शेअर मार्केटमध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज गुरुवारीही शेअर मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. मार्केट सुरु होताच २०४५ अंकांनी शेअर मार्केट घसरले. २०४५ च्या घसरणीने निर्देशांक २६ हजार ८२३ वर पोहोचला आहे.