शेंदूर्णीत ललवाणी विद्यालयात अभिवादन कार्यक्रम

0

शेंदूर्णी – येथील स्व.शेठ राजमल लखीचंद ललवाणी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर.जे.पाटील होते. प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे हस्ते प्रतिमापुजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा मार्गाने देश स्वतंत्र करण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला व लाल बहादुर शास्त्री यांच्या विषयी मनोगत व्यक्त करतांना शास्त्रींजी हे असे नेतृत्व भारताला लाभले की त्यांची मुर्ती लहान पण किर्ति महान होती ते भारताचे माजी पंतप्रधान त्यांनी ‘जय जवान जय किसान’ असा नारा भारतीयांना दिला. शाळेचे शिक्षक व्हि.टि .नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक के.एस.ठाकुर यांनी केले. कार्यक्रमास बजरंग राजपुत, मुख्याध्यापक खलचे, खोडपे सर सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.