शेंदुर्णी येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात

0

शेंदुर्णी । सातव्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून शेंदुर्णी येथे सुर्यदिप शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कन्याशाळेत बुधवारी 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार तथा जामनेर तालुका निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव टिळेकर, प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील, ममता सुर्यवंशी, सर्योदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गुजर, किशोर शिनकर, मुख्याध्यापक गोसावी गुरुजी, तलाठी नाईक आप्पा व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. सुरुवातीला सरस्वती पुजन व आयोजकांतर्फे आलेल्या सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार झाला.

नवमतदार ओळखपत्राचे झाले वितरण
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रदिप गुजर यांनी केले. नामदेव टिळेकर मतदार मोहिम, मतदार समस्या व मतदानाचे लोकशाहीतील महत्वाविषद करुन नवमदार व सर्वांना लोकशाही मतदारांनी शपथ दिली व मान्यवरांच्या हस्ते सर्व नवमतदारांना नवीन ओळपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच गावातील सर्व मतदार केंद्रांना भेटी देवून त्यातील व्यवस्था व समस्यांची पाहणी करुन योग्य सुचना केल्या. सदर कार्यक्रमास शेंदुर्णी शहरातील सर्व बुथस्तरावरील अधिकारी नोंदणी कर्मचारी, नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन साहेबराव महाले यांनी प्रस्ताविक सुर्यदिप शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप गुजर यांनी तर आभार किशोर शिवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जि.प.कन्या शाळा मुख्याध्यापक तसेच तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांनी व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.