शेंदुर्णी येथे बँकात पैसे काढण्यासाठी नागरीकांची प्रचंड गर्दी

0

शेंदुर्णी । येथील राष्ट्रीयकृत बँकात नागरीकांच्या पैसे काढण्यासाठी रांगा कायम असुन स्टेट बँक, युनियन बँक, सेन्ट्रल बँक या सर्व राष्ट्रीयकृत बँकाच्या येथे शाखा आहेत. मात्र येथील स्टेट बँकेकडून उपलब्ध रोकड मधुन सेन्ट्रल बँक व युनियन या राष्ट्रीयकृत बँकाना कमी व व्यापारी बँक असलेल्या पाचोरा पिपल्य बँकेस अधिक पैसे उपलब्ध करुन देतानाच आपल्या ग्राहकांना बँकेतुन 24 हजारापर्यंत एकरकमी रक्कम देत असल्याने तेथे तोबा गर्दी होत असुन सेंन्ट्रल बँकेत व युनियन बँकेत कमी पैसे उपलब्ध होत असल्यामुळे तेथील ग्राहकांना 4 व 2 हजारासाठी मात्र दिवसभर हेलपाटे घालावे लागत आहे.

तिन्ही बँकेत समान रोकड उपलब्ध नाही
तीनही राष्ट्रीयकृत बँका असतांना सर्वांना समान रोकड उपलब्ध का करुन दिली जात नाही असा सवाल ग्राहक करत असुन राष्ट्रीयकृत बँकापेक्षा व्यापारी बँकाचे हित जपण्यात स्टेट बँकेस काय स्वारस्य आहे? असा चर्चेचा विषय बनत आहे तरी जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालुन सेंन्ट्रल बँक व युनियन बँकेच्या ग्राहकांना दिलासा मिळवुन देतानाच गेल्या महिनाभरापासुन बंद असलेल्या एटीएम मशीन चालु करावे व शहरी ग्राहकासारखेच ग्रामीण बँक ग्राहकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी. अशी नागरीकांची मागणी आहे. तसेच येथील पिपल्स् बँकेत तीन हजार रुपयाचे हजार, पाचशेच्या नोटा जमा करणार्‍या व्यक्तींना वेगवेगळे कागद पत्र मागीतले जात असुन मोठी रक्कम हजार व पाचशेच्या स्वरुपात
भरणार्‍या व्यक्तीकडुन मात्र योग्य कागदपत्र न घेताच नोटाचा कर्ज खाती भरणा केला जात आहे. मात्र याची चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच येथेही सर्व सामान्य ग्राहकांची रोकड नसल्याची कारणे देऊन बोळवन केली जात असुन व्यापार्‍यांना मात्र वेगवेगळ्या नावावर पैसे उपलब्ध करुन दिले जात आहे.