शेंदुर्णी येथे २४ रोजी राष्ट्रवादी व कॉग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा

0

शेंदुर्णी । आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुकीचे पार्श्वभुमीवर शेंदुर्णी येथील पहुर रस्त्यावरील सोनी जिनिंग चे आवारात मंगळवारी 24 जानेवारी 2017 रोजी जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेस व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांचा संयुक्त भव्य मेळाव्याचे आयोजित करण्यात आले आहे.

त्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी मंत्री दिलीपजी वळसे पाटील, अरुणभाई गुजराथी, आमदार सतिष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, कॉग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सुरेश धस, विनायकराव देशमुख, डॉ.उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील, अंल्पसंख्यांकचे हाजी गफ्फारभाई मलीक, विलास पाटील, अविनाश भालेराव, डि.जी.पाटील, योगेशजी देसले यांचे मार्गदर्शन लाभणार असुन जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रसे व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थीत राहणार आहेत. अमळनेर येथील भाजपचे माजी जिल्हा परीषद सदस्य व जिल्हा बँक संचालक अनिल पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तरी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे, आवाहन मेळावा आयोजक जिल्हा परीषद सदस्य संजय गरुड, तालुकाध्यक्ष प्रा.शरद पाटील, अजय पाटील यांनी केले आहे.