Private Advt

शेंदुर्णीत गोदामातील ढेपसह कापसाच्या गाठी भस्मसात

शेंदुर्णी : शहरातील खरेदी-विक्री संघाच्या खाजगी व्यापार्‍या भाडेतत्वावर दिलेल्या गोदामाला मंगळवारी रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत ढेपच्या साठ्यासह कापसांच्या गाठीसह अन्य सामग्री जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.

आगीचे कारण अस्पष्ट
शेंदुर्णी येथे मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास सहकारी खरेदी-विक्री संघाच्या भाडेतत्त्वावर दिलेल्या गोदामाला भीषण आग लागली. काही मिनिटांमध्येच या गोदामातून आगीचे मोठे लोळ दिसू लागल्याने परीसरातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. पाहता-पाहता आगीने भीषण स्वरूप धारण केले. यानंतर नागरीकांनी स्वत: आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी यात यश आले नाही. दरम्यान, अग्नीशामन दलाच्या पथकाने प्रयत्नांची मोठी शर्थ करून आगीवर नियंत्रण मिळविले.

लाखोंचे नुकसान
या भीषण आगीत ढेपसह कापसाच्या गाठी व इतर साहित्य व यंत्र जळून खाक झाल्याने लाखो रुपयांची वित्तहानी झाल्याचे समजते. . संबंधीत सहकारी संस्थेचे गोदाम पवन राजमल अग्रवाल व राजमल अग्रवाल यांनी भाडेतत्त्वावर घेतले असून या गोदामात त्यांनी ढेप आणि इतर व्यापार्‍यांनी कापसाच्या ठेवलेल्या गाठी या आगीत भस्मसात झाल्या.