शेंदुर्णीतील रस्त्याचे काम दोन वर्षापासून अपुर्णच

0

 

शेंदुर्णी : शहरातील स्टेट बँकपासून बसस्थानक ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी लाखोच्या बजेट दोन वर्षात कोटीच्या घरात गेले. परंतु नागरीकांच्या मागचा धुळीचा त्रास व खड्ड्यांवरील सर्कस काही केल्या कमी होत नाही. गेल्या दोन वर्षापासुन खोदून ठेवलेल्या रस्त्यास एक महीन्यापुर्वी महुर्त मिळाला खरा पण 30-40 मिटरचे काँक्रीटीकरण करुन महिन्यापासुन काम बंद पडले असुन रस्तासुद्धा वापरण्यास आता बंद करण्यात आला आहे. रस्त्यामागे लागलेले शुक्लकाष्ट काही केल्या मिटत नसल्यामुळे “रस्ता नको पण तुझा पसारा आवर” असे म्हणण्याची वेळ येथील नागरीक व दुकानदारांवर आली असुन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाला रेती अभावी ब्रेक लागला असे सांगीतले जात आहे. पंधरा दिवसांपुर्वी काँक्रीटीकरणाच्या कामाला स्टेट बँके जवळील काँक्रीटी करणाचे काम एका बाजुने सुरवात करुन करण्यात आली तो रस्ता वापरासाठी बंद करुन ठेवला असुन कामही बंद आहे काँक्रीटकिरण करतांना रस्त्याच्यस्बिाजुने लावलेल्या गर्डरच्या आसार्‍यासुद्धा काढलेल्या नसल्याने गर्दीच्यावेळी शालेय विद्यार्थी किंवा नागरीक त्यावर पडुन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.

वाळू नसल्याने कारण दाखवत कामाला ‘थांबा’
संबधीत कंत्राटदारांनी प्रशासनास शासकीय कामासाठी रेती उपलब्ध करुन देण्याची विनंती केली आहे. परंतू, लिलाव बंद झाल्याचे कारण देत रेती लिलाव सुरु होईपर्यंत काम बंद ठेवण्याचे आधिकार्‍यांकडून सांगण्यात आल्याचे समजते. सदर रस्त्यावर स्टेट बँक, सेंन्ट्रल बँक, मंगल कार्यालये, बस स्थानक, ग्रामपंचायत, स्वामी समर्थ केंद्र, हनुमान मंदीर यांकडे जाण्याचा मार्ग असल्याने तसेच सोयगावकडून आणि इतर खेड्यांकडून येणार्‍या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर रहदारी निर्माण होते. सद्या नोटबंदीमुळे बँक परीसरात नागरिकांची पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे.

अपुर्ण कामामुळे शहरात वाहतूकीची कोंडी
इतर कामासाठी आलेले नागरीक आपल्या मोटरसायकली बँकेच्या जवळच्या रस्त्यावरच पार्क करीत आहेत त्यातच अर्धा रस्ताच वाहतुकीसाठी मोकळा असल्याने सोयगावकडे जाणार्‍या लहानमोठ्या तसेच बँक परीसरातील वाहने आणि खाजगी प्रवासी वाहतूक वाहनांमुळे होणारी वाहतुक कोंडी सहन करुन प्रसंगी लहान मोठा अपघातास सामोरे जात नागरीकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अर्ध्या रस्त्यावरून चालणे आणि वाहन चालविणे अवघड झाले आहे. रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरीकांना आशेचा किरण दिसत असतांनाच सुरू झालेले काम रेती उपलब्ध नसल्याने बंद झाल्याने रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला आहे.

माहीती दर्शविणारा फलक नसल्याने नागरीकांमध्ये संभ्रम
सदर रस्त्याचे भुमीपुजन प्रसंगी कामाचे बजेट, कोणत्या योजनेतुन किती निधी उपलब्ध करण्यात आला. तसेच किती अंतर लांबीचा व जाडीचा रस्ता होणार आणि वापरण्यात येणार्‍या साहित्यांबाबतची माहीती दर्शविणारा फलक काम सुरु होण्याआधी नागरीकांचे माहीतीसाठी लावणे आवश्यक असतांना रस्त्या विषयी संबधीत खाते व ठेकेदार कुठलीही माहीती देत नाही. वर्दळीचा रस्ता असतांनाही कामात आसारी वापरली जात नसल्याने काँक्रीटीकरण कामाच्या दर्जा विषयी शंका उपस्थित केले जात आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी कामावर लक्ष घालुन वेळेत दर्जेदार गुणवत्तापुर्ण रस्ता होण्यासाठी संबधीत अधिकारी व ठेकेदारास भाग पाडावे तसेच शासनाच्या निधी मधुन होत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी लागणारी वाळू महसुल प्रशासनाने लवकरात लवकर उपलब्ध करुन रस्त्या सोबतच गटारी, मोर्‍या अशी सर्व कामे एकाच वेळी करुन गेले दोन वर्षापासून नागरीक सहन करीत असलेल्या त्रासातुन एकदाची सुटका करावी अशी मागणी नागरीकांकडून होत आहे.