शिव थापा, सुमीत सांगवान अंतिम फेरीत

0

ताश्कंद। चौथ्या मानांकित शिवा थापाने येथे सुरू असलेल्या आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये 60 किलो वजन गटातून खेळताना शानदार विजय मिळवित अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. शिवने उपांत्य फेरीतील लढतीत ऑलिम्पिक कांस्य विजेत्या मंगोलयिन द्रोणयामबुला पराभूत केले.

75 किलो वजन गटात विकास कृष्णनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. थापाने शुक्रवारी मंगोलियाच्या द्रोणयामबुला पराभूत करताना अंतिम फेरीत धडक मारत आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील आपले पदक निश्चित केले. अंतिम फेरीत शिवासमोर उझबेकिस्तानच्या एल्नोर अब्रुडोमव्हचे आव्हान असेल. उझबेकच्या एल्नोरने चीनच्या जून शानला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. 91 किलो गटात भारताच्या सुमीत सांगवानने शानदार विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीतील लढतीत त्याने तैवानच्या दुसर्‍या मानांकित तेजेक जाखूनला नमवले.