Private Advt

शिवाणी शिवारातील मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून डिझेलची चोरी

भडगाव:तालुक्यातील शिवाणी शिवारातील एअरटेल मोबाईल टॉवरच्या जनरेटरमधून 50 लिटर डिझेलची चोरी झाली. याबाबत भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
भडगाव तालुक्यातील शिवाणी शिवारात सिंधी गावाजवळ एअरटेल टॉवर असून या टॉवरच्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्थान करण्यात आली आहे. दरम्यान, 22 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान अज्ञात चोरट्यांनी जनरेटरमधून पाच हजार रुपये किंमतीचे 20 लिटर डिझेल लांबवले. या प्रकरणी रवींद्र अरविंद पाटील (निमखेडी शिवार, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक निलेश ब्राम्हणकर करीत आहे.