Private Advt

शिवाजी नगर भागात व्यावसायीकाची दुचाकी जाळली

जळगाव : शहरातील शिवाजीनगर हुडको भागात व्यावसायीकाची दुचाकी जाळण्यात आली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताने दुचाकीला लावली आग
शिवाजीनगर येथे नीरज दत्तराजसिंग परदेशी (24) हे कुटुंबियासह वास्तव्याला असून ते रविवार, 20 मार्च रोजी शिवाजी नगर हुडका भागात गेले असता एका इमारतीसमोर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.डब्ल्यू 4143) उभी केली असता पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुचाकी कुणीतरी जाळल्याचे समोर आले. घटनेत दुचाकी पूर्ण जळून खाक झाल्याने परदेशी यांचे 55 हजारांचे आर्थिक नुकसान झाले. या प्रकरणी नीरज परदेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास महिला पोलिस नाईक वैशाली पावरा या करीत आहेत.