Private Advt

शिवाजी नगरात मुलांच्या भांडणानंतर महिलांमध्ये हाणामारी

जळगाव : शहरातील शिवाजी नगरात लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून महिलेला दोघा महिलांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघा महिलांविरोधात गुन्हा
सुमय्याबी अय्युब खान (27, शिवाजी नगर) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 24 मे रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अंगणात लहान मुले चकरी खेळ खेळत असतांना चकरी ही शेजारी राहणार्‍या मंगला जाधव यांच्या घरावर गेली. या कारणावरून मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव (दोन्ही रा.शिवाजी नगर) यांनी सुमय्याबी अय्युब खान यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या प्रकरणी सुमय्याबी यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर रात्री 9 वाजता शहर पोलिस ठाण्यात मंगला जाधव आणि लक्ष्मी जाधव (दोन्ही रा.शिवाजी नगर) यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.