Private Advt

शिवाजी नगरातील प्रौढाचा अकस्मात मृत्यू

भुसावळ : शहरातील आठवडे बाजारातील अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर शिवाजी नगर भागातील 55 वर्षीय प्रौढाचा मृतदेह आढळला. मृत्यूचे नेमके कारण कू शकले नाही. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. संजू महिपत मेढे (55, रा.शिवाजी नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे.

आठवडे बाजारात आढळला मृतदेह
शहरातील आठवडे बाजारातील भाजीपाला ओट्याजवळ असलेल्या अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेतली तर मयुर मिलिंद जाधव (रा.खडका रोड, लाल बिल्डींग जवळ, भुसावळ) यांनी खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृतेदहाची ओळख पटवली असता तो शहरातील संजू महिपत मेढे यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहे.