शिवाजीनगरातील गोडाऊनला आग; सिगारेटसह खाद्यपदार्थांचे नुकसान

जळगाव- शिवाजीनगरातील आयुक्तांच्या बंगल्याशेजारील परिसरातील एका गोडाऊनला 15 रोजी दुपारी 4.45 वाजेच्या सुमारास आग लागली. यात सिगारेटसह खाद्यपदार्थ जळून खाक झाले. यात सुमारे 52 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू (वय 46 रा.जैन पाईप फॅक्टरी, निमखेडी रोड) यांचे शिवाजीनगरात गोडाऊन आहे. ते या गोडाऊनमध्ये सिगारेटसह खाद्यपदार्थांचा माल ठेवतात. या गोडाऊनला आग लागल्याचे त्याच परिसरातील अरुणकुमार लक्ष्मीनारायण जाजू यांच्या बहीण निर्मला यांना कळाले. या महिलेने या आगीच्या घटनेबाबत त्यांचा भाऊ अरुणकुमार जाजू यास मोबाइलने कळविले. याबाबत कळताच गोडाऊनचे मालक अरुणकुमार जाजू घटनास्थळी पोहचल. या आगीत गोडावूनमधील 42 लाखांच्या सिगारेट व 10 लाखांचे बिस्कीटसह इतर खाद्यपदार्थ असा एकूण 52 लाखांचा माल खाक झाला. ही आग अग्निशमन दलाच्या पथकाने विझविली. याप्रकरणी अरुणकुमार जाजू यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रहिवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास शहर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Copy