शिवसैनिकांनो भुसावळ पालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

भुसावळ : शहरातील जुना सातारा भागातील शिवसेना विभागीय कार्यालयास जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी सोमवारी सदिच्छा भेट दिली. आगामीम भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री यांनी दिल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री निधीतून भुसावळ शहरात अनेक कामे केली असून ही सर्व कामे प्रत्येक नागरीकांपर्यंत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पोहोचवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी नगरसेवक दीपक धांडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा.धीरज पाटील, माजी तालुकाप्रमुख नीळकंठ फालक, उपतालुकाप्रमुख पप्पू बारसे, शहरप्रमुख बबलू बर्‍हाटे, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, अ‍ॅड.निर्मल दायमा, उपशहर प्रमुख स्वप्नील सावळे, सोनी ठाकूर, देवेंद्र पाटील, गोकुळ बाविस्कर, प्रीतम टाक, पिंटू भोई, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, अमोल पाटील, शांताराम बैलम व पदाधिकारी उपस्थित होते.

नागरीकांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य
शहराच्या विकासासाठी शिवसेना कटीबद्ध असून शिवसेना कार्यालयाच्या माध्यमातून नागरीकांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे , असे माजी नगरसेवक दीपक धांडे यांनी सांगितले.

Copy