शिवसेनेत 110 महिलांनी घेतला प्रवेश

1

जळगाव : शिवसेनेवर विश्वास दाखवुन तसेच आम्हा महिलांच्या समस्या शिवसेनाच दुर करेल या भावनेने आम्ही महिला शिवसेनेत प्रवेश करीत आहोत असे विधान 110 महिलांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केले. जळगाव विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप दळवी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी महिलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या शहरात असलेल्या निवासस्थानी 110 महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी या महिलांचे स्वागत जळगाव विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप दळवी यांनी केले. तसेच सुरेशदादा जैन यांनीही महिलांचे आभार मानले. प्रवेश झाल्यानंतर महिला प्रतिक्रिया देतांना म्हणाल्या की, शिवसेना आमची मायबाप आहे. शिवसेनेवर आमचा पुर्ण विश्वास आहे. म्हणून आम्ही शहरातील विविध परिसरातील अनेक महिलांनी आज शिवसेनेचे नेतृत्व स्विकारले आहे. यावेळी महानगरप्रमुख गणेश सोनवणे, महिला संघटक मंगला बारी, प्रकाश बेदमुथा, नगरसेवक जितेंद्र मुदंडा यांचेसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.