Private Advt

शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट – संजय राउत

मुंबई – “आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही” अस मत संजय राउत यांनी व्यक्त केल आहे. भाजपाशी पुन्हा युती करावी, अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केल्या मुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचं ठरवलं असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्याने आता भाजपशी जुळवून घ्यावे, असं मत सरनाईक यांनी व्यक्त केले होते.यामुळे यावेळी त्यांना काही गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान यामुळे शिवसेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरु असल्याच्या प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.