शिवसेनेत पदांचे लॉलीपॉप

0

मुंबई । सेनेलाही बंडखोरी व नाराजीची लागण झालेली दिसत आहे. तिकीट वाटपावरून, तिकीट कापल्यावरून, निष्ठांवतांना तिकीट न देता आयाराम झालेल्यांना तिकीट दिल्याने अनेकांनी बंडखोरी केली. हि बंडखोरीची लागण थांबविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी अटोकाट प्रयत्न सुरू केले आहे. बंडखोरीमुळे सेनेच्या उमेदवारांचे तसेच सेनेच्या मतांचे विभाजन होणार असल्याने सेनेच्या नेत्यांनी हे विभाजन टाळण्यासाठी माघारी पुर्वीच बंडखोरांना समजविण्याचे प्रयत्न सेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरु झाले आहे. मुंबई हा सेनेचा बालेकिल्ला असल्याने त्याठिकाणी होणार्‍या निवडणूकीत बडखोरीमळे सेनेचे नुकसान होवू नये म्हणून ज्यांनी बंडखोरी केली आहे त्यांना पदोन्नती किवा वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स द्ल्यिा जात आहे.तर घराणे शाहीचा आरोप करणारी सेनाही याच मार्गवर पदाक्रमण करित आहे.ठाण्यात दिलेल्या तिकिटावरून हे स्पष्ट झाले आहे की सेनेत कार्यकर्त्यांपेक्षाही घराणेशाही मोठी होतांना दिसत आहे.

मतांचे विभाजन टाळण्याचे प्रयत्न
मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे चित्र समोर आले आहे.आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकराच्या विरोधात अपक्ष अर्ज भरणारे महेश सावंत यांना सध्या विभागप्रमुख पदाची ऑफर दिल्याची चर्चा आहे. तर, अभ्युदयनगर मध्ये बंडखोरीच्या तयारीत असणारे इच्छुक जयसिंग राठोड यांनाही चांगल्या पदाचे आमिष देण्यात आले आहे.माजी महापौर श्रद्धा जाधवांविरोधात शिवसेनेच्या दोन महिला कार्यकर्त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे. वरळी कोळीवाडा विद्यमान नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांच्या विरोधात बंडखोरी करण्यात आली आहे.शिवसैनिक नवनाथ करंदेकर यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.वरळी, प्रभादेवी, दादर, परळ, माहीम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या बरीच बंडखोरी सुरु आहे. त्यामुळे सध्या स्थानिक विभागप्रमुख आणि वरिष्ठ नेतृत्वाकडून समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. नाराज शिवसैनिकांची बंडाळी मोडून काढण्यासाठी बंडखोरांना वेगवेगळ्या पदांच्या ऑफर्स दिल्या जात असल्याची माहिती मिळते आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेचे अटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेतही ठाण्यात नेत्यांच्या नातेवाईकांचा भरणा
सरनाईक
1) परीषा सरनाईक ( पत्नी),
2) पुर्वेश सरनाईक (मुलगा),

देवराम भोइर
1) देवराम भोइर ( स्वत:)
2) संजय भोइर ( मुलगा )
3) उषा भोइर ( सुन)
4) भूषण भोइर ( मुलगा)

राजन विचारे
1) नंदिनी विचारे ( पत्नी ),
2) मंदार विचारे ( पुतण्या)

एकनाथ शिंदे
1) प्रकाश शिंदे ( भाऊ)

सुभाष भोइर
1) सुमित भोइर ( मुलगा)

रविंद्र फाटक
1) जयश्री फाटक ( पत्नी )
2) नम्रता फाटक ( वहिनी)

एच.एस. पाटिल
1) एच एस पाटिल ( स्वत:)
2) कल्पना पाटिल ( पत्नी)
3)स्नेहा पाटिल ( सून )

अनंत तरे
1) संजय तरे ( मुलगा )
2) महेश्वरी तरे ( सून )