शिवसेनेच्या वतीने स्वस्त दरात केली भाज्यांची विक्री

0

जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील व्यापारी अत्यावश्यक वस्तूची चढ्या भावाने विक्री करीत असल्याच्या अनेक तक्रारी नागरीकांच्या असून कोरोना संसर्ग आजराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण असल्याचा व संचारबंदी चा गैरफायदा व्यापाऱ्यांनकडून होत असल्याने शिवसेनेच्या वतीने स्वस्त दरात टोमॅटो, वांगी,भेंडी व इतर भाज्यांची विक्री फक्त प्रति किलो २० रु या दराने विक्री करून नागरिकांची मदत केली आहे युवा सेनेचे मा.उपजिल्हा प्रमुख अँड भरत पवार यांच्या संकल्पनेतुन सुधाकर शेट सराफ,अँड प्रकाश पाटील,शहर प्रमुख पवन माळी, ज्ञानेश्वर जंजाळ,महेंद्र बिहाडे,कैलास चौधरी, गजानन कोळी यांच्या सहकार्याने अल्प किमतीत शहरवासीयानसाठी भाजीपाल्याचे स्टाँल सुरू केले आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन चांगला प्रतिसाद मिळत आहे

Copy