शिवसेनेच्या पं. स. सभापती, माजी उपसभापतीला जुगार खेळतांना अटक

0

जळगाव : लॉकडाऊन काळात सर्व नियम धाब्यावर बसवून तालुक्यातील कुर्‍हाडदे शिवारातील एस.पी.पाटील यांच्या शेतात सत्ताधारी पक्षातील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी गावकर्‍यांचा रंगलेला जुगाराचा डाव एमआयडीसी पोलिसांनी रविवारी सायंकाळी उधळुन लावला. या कारवाईत पोलिसांनी शिवसेनेचे पंचायत समितीचे सभापती नंदलाल शांताराम पाटील (वय 45) यांच्यासह माजी उपससभापती धोंडु शामराव जगताप (वय 48) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 16 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रविवारच्या या कारवाईमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी राजकीय दबाव झुगारात केली अटक

लॉकडाऊन काळात जमावबंदी, संचारबंदी लागु करण्यात आली आहे. अशात सत्ताधारी पक्षातील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी गावकर्‍यांसह शेतात जुगार खेळत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, जितेंद्र राठोड, प्रकाश पवार, हेमंत पाटील यांच्या पथकाने शेतात धाव घेतली. या शेतातून एकुण 16 जणांना जुगार खेळतांना अटक करण्यात आली. यात पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील व माजी सभापती धोंडु जगताप हे देखील मिळुन आले. नंदलाल पाटील यांनी घटनास्थळावरुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला. परंतू, पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन अखेर पाटील यांना देखील अटक केली. दरम्यान, कारवाई दडपण्यासाठी दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र सहायक पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन व निरीक्षक विनायक लोकरे यांनी हा दबाव झुगारुन लावला.

जुगार खेळणार्‍या या 16 जणांविरुध्द कारवाई

मनोज रामकृष्ण बारी (वय 39), कृष्णा राजु सोनवणे (22), राहुल राजेंद्र ताडे (22), भुषण लोटु खलसे (24), सचिन बाळु बारी (21), विनोद लक्ष्मण मोरे (24), सुनील शंकर काटोले (46), बापु सिताराम महाजन (42), शिवाजी हरी बारी (45), शिवदास उत्तम बारी (38), नंदलाल शांताराम पाटील (45), राहुल कृषा बारी (33), महेश विक्रम महाजन (24, सर्व रा.इंदिरानगर, शिरसोली), धोंडु शांताराम जगताप (वय 48, रा.बिलवाडी) व गोरख रामसिंग केदारे (वय 51, रा.दापोरा) या 16 जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे संपुर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या जुगारींकडून जुगाराच्या साहित्यासह 31 हजार 400 रुपयांचे जप्त करण्यात आले आहेत.

Copy