शिवसेनेचे यश फूटपट्टीत : शेलार

0

मुंबई : काँग्रेस आणि शिवसेनेने मॅच फिक्सिंग झाल्यानंतरही त्यांचे यश फूटपट्टीत झाले तर आम्हाला कितीतरी पटीने यश मिळाले, असा टोला मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला.

या निवडणुकीत शिवसेनेला ८४ तर भाजपाला ८२ जागा मिळाल्या. शिवसेनेचे पूर्वी ७५ होते तर आमचे ३२. शिवसेना तीन आकडे लावत होते. जमले फक्त ८४. ३१ ठिकाणी काँग्रेस, नऊ ठिकाणी राष्ट्र्वादी काँग्रेस, तीन ठिकाणी एमआयएम, सहा जागा समाजवादी पार्टी, सात जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर एक जागा अखिल भारतीय सेनेला मिळाली. अपक्षांपैकी चार जणांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. रहेबर राजा खान यांनी भाजपाला समर्थन दिले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व्भा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यां कर्तृत्वाचा हा विजय आहे. गिरगावात भाजपाने दोन तर मुलुंड विधानसबेतल्या सहाच्या सहा जागा जिंकल्या. वांद्रे पश्चिममध्ये काँग्रेस आणि सेनेने फेविकोल लावले तरी काँग्रेस आणि सेनेला एकच जागा लागली. भाजपाने तीन जागा जिंकल्या . दोन ठिकणी सेनेचे डिपॉझिट जप्त झाले. यापुढे पारदर्शी अजेंडावरच भाजपा काम करेल, असेही शेलार म्हणाले.