शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भुसावळात वृक्षारोपण

0

भुसावळ : शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त सर्व प्रथम शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी शहर प्रमुख नीळकंठ (पंच्छी) फालक, निलेश महाजन, बबलू बर्‍हाटे, पप्पू भैय्या बारसे, पूनम बर्‍हाटे, भुराबाई बारसे, शारदा धांडे, अ‍ॅड.श्याम गोंदेकर, हेमंत चौधरी, देवेंद्र पाटील, ललित मुथा यांच्याहस्ते करण्यात आले. प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दीपक धांडे यांच्या माध्यमातून 54 झाडे लावण्यात आली. या सर्व झाडांचे संवर्धन करण्यासाठी (ट्री गार्ड) सुध्दा लावण्यात आले. झाडे मोठी होतील तस-तशी शिवसेना सुध्दा भुसावळ शहरात व परीसरामध्ये मोठी होईल, असा मनोदय दीपक धांडे यांनी व्यक्त केला. या सर्व ट्री गार्डवर सर्व पदाधिकार्‍यांचे शुभ हस्ते म्हणून नावे टाकण्यात आले आहेत.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी युवा सेनेचे तालुकाप्रमुख हेमंत बर्‍हाटे, युवा सेनेचे सुरज पाटील, शिवसेनेचे प्रा.धीरज पाटील, अ‍ॅड.नरेंद्र लोखंडे, गोकुळ बाविस्कर, सागर वाघोडे, जगू खेराडे, दत्तू नेमाडे, राकेश देशमुख, अमोल ठाकरे, मिलिंद कापडे, धनराज ठाकूर, शरद जोहरे, पिंटू भोई, संदीप भोई, राकेश खरारे, योगेश बागुल, स्वप्नील सावडे, दिगंबर धनगर, नमा शर्मा यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Copy