शिवसेना नगरसेवकांची मनपात गांधीगिरी

0

बालाणींच्या दालनातील खुर्चीला हार घालून केला सत्कार

जळगाव: मनपात भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमधील वाद अगदी टोकाला गेले आहेत. एकमेकांकडून आरोप-प्रत्यारोप होवू लागले आहेत. भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी घरकूल प्रकरणात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून या प्रकरणातून माजी आमदार सुरेशदादा जैन , माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्यासह आम्ही निर्दोष होवू असे विधान केले. बालाणी यांनी सत्य बोलण्याचे धाडस केल्यामुळे शिवसेनेने त्यांचा जाहीर सत्कार करण्याचे ठरविले होते. त्यानुसार बुधवारी शिवसेनेचे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन,बंटी जोशी,विष्णू भंगाळे,महानगरप्रमुख शरद तायडे मनपाती बालाणींच्या दालनात गेले.मात्र ते तिथे नसल्यामुळे त्यांचा खुर्चीला हार, शाल, रोख 501 रुपये व श्रीफळ वाहून सत्कार करत गांधीगिरी केली.

महापालिकेत भाजप- शिवसेनेच्या सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यात सफाई मक्तेदारावरून शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेल्या आरोपाला उत्तर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिले होते. त्यामुळे जोरदार शिवसेना-भाजपच्या सदस्यांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. त्यात बालाणी यांनी माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्यासह आम्ही घरकुल घोटाळ्यातून निर्दोष सुटू असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने बालानींचा सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार शिवसेनेच्या नगरसेवकांनी बालाणींच्या खुर्चीचा सत्कार करत गांधीगिरी केली. दालनातले माजी सभापतींच्या नावांचे नामफलक उलटे ठेवल्याचे शिवसेने गटनेते बंटी जोशी यांच्या निदर्शनास आले. माजी पदाधिकार्‍यांच्या नावांचे फलक काढून ठेवल्याने शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात आला.

Copy