शिवसेना-कॉग्रेसमध्ये ठिणगी; मुख्यमंत्र्यांच्या विधानावर कॉग्रेस नेते नाराज

मुंबईःराज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यात काल मुुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या आरोपांवर जोरदार टीका केली. बाबरी मशिद पाडण्यात शिवसैनिक पुढे होते आणि आम्ही बाबरी मशिद पाडली हे अभिमानाने सांगतो असे विधान केले होते. या विधानावरुन कॉग्रेसचे नेते नाराज झाले आहे. कॉग्रेस नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी या विधानावरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली असून कॉग्रेस आमदारांनाही टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बाबरी मशिद पाडल्याचे अभिमानाने सांगतात आणि कॉग्रेसचे आमदार त्यांचे समर्थन करतात असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे.

Copy