शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकरांनी दिला पदाचा राजीनामा

भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघातील नूतन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीत अन्याय झाल्याचे कारण देत शिवसेना उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.श्याम श्रीगोंदेकर यांनी आपल्या पदाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. अ‍ॅड.गोंदेकर यांनी दिलेल्या राजीनामा पत्रानुसार, गेल्या 30 वर्षांपासून ते शिवसेनेत पक्षाने दिलेल्या पदावर कार्यरत होते मात्र रावेर लोकसभा मतदारसंघातील नूतन जिल्हाप्रमुखांच्या नियुक्तीत अन्याय झाल्याने आपल्या एकनिष्ठतेचा घात झाला असून व्यथीत होवून आपला हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. पक्ष श्रेष्ठींनाही राजीनाम्याची प्रत पाठवण्यात आली आहे.

Copy