शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

मुंबई : कुर्ला मतदार संघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (42) यांनी रविवारी कुर्ला येथील राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. रविवारी रात्री नऊच्या सुमारास रजनी यांनी गळफास घेतला. रजनी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

नैराश्यात आत्महत्या केल्याचा अंदाज
कुर्ला मतदारसंघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे कुडाळकर हे नैराश्यात होते. याच दरम्यान त्यांची पत्नी रजनी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.