शिवसेनातर्फे विज वितरण कंपनी अभियांत्याचा सत्कार

0

जळगाव – जळगाव शहरात ऐन सणासुदीच्या व परीक्षेच्या काळात भारनियमन सुरु केल्याबद्दल महानगर शिवसेनेतर्फे विज वितरण कंपनीचे शहर अभियंता यांना कंदील भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव शहरात कालपासून अघोषित नऊ तासांचे भारनियमन विज वितरण कंपनीकडून करण्यात येत आहे. ऐन सणा सुदीच्या काळात व महाविद्यालयीन परीक्षा याच काळात सुरु होणार असून त्याचवेळी भारनियमन करण्यात आल्याने नगरीकांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेना जळगाव महानगरतर्फे शहर अभियंता तडवी यांना कंदील व मेनबत्या भेट देण्यात आल्या. महानगर प्रमुख शरद तायडे यांनी लोडशेडिंग प्रश्नी आक्रमक होत शहर अभियंता तडवी यांना जाब विचारला असता, त्यांनी कोळशाचा पुरवठा कमी होत असल्याचे कारण पुढे केले. त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल व झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ही श्री.तायडे यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, गणेश सोनवणे, चेतन शिरसाळे, नितिन राजपूत, महिला आघाडी महानगर प्रमुख शोभा चौधरी, ज्योति शिवदे, मनीषा पाटील, उप महानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, प्रवीण पटेल, स्वामी पाटील, विभागप्रमुख गणेश गायकवाड, राहुल नेतलेकर, हेमंत महाजन, राहुल नेतलेकर, विजय बांदल, नीलेश पाटील, विपिन पवार, जीतू गवळी, जब्बार शेख, अशपाक शाह यांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Copy