शिवरायांशी मोदींची तुलना: शरद पवार जाणता राजा कसे?: सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई: दिल्ली भाजपाच्या कार्यालयात एका पदाधिकाऱ्याने ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहून त्याचे प्रकाशन केले. हा प्रकार आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकरणी भाजपाने माफी मागावी आणि पुस्तक तातडीने रद्द करावे अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान यावर माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवरायांची तुलना कोणाशीही होणार नाही. हा प्रकार काही कार्यकर्त्यांचा आहे आणि तो भाजपला मान्य नाही. विरोधकांकडून याचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही पण शरद पवार हे जाणता राजा कसे असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

कॉंग्रेसने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना ‘इंडिया इस इंदिरा’ अशी केली होती. तो समस्त भारतीयांचा अपमान होता. तो कसा कॉंग्रसने सहन केला असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. विरोधकांकडून खालच्या पातळीवर राजकारण सुरु असून ते अशोभनीय आहे असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

Copy