शिवरायांबाबत मला आदर, मी छत्रपतींचा अनुयायी: व्यंकय्या नायडूंचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली: काल भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथविधी झाल्यानंतर त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. त्यानंतर उपराष्ट्रपती राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी शपथ घेताना फक्त शपथ वाचा इतर नवे घेऊ नका असे सांगितले. या प्रकारावरून शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका देखील होत आहे. दरम्यान उपराष्ट्रपतींनी आज गुरुवारी यावर स्पष्टीकरण दिले आहे. उदयनराजे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्याने यावादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

“शिवरायांबाबत मला आदर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. राज्यसभेमध्ये शपथविधीवेळी मी जी सूचना केली ती परंपरेला अनुसरून होती. शपथविधीवेळी कुठल्याही घोषणा देण्यात येत नाही. यामध्ये कुणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती” असे ट्वीट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

‘जे घडलेच नाही त्याचे राजकारण’; ‘त्या’ शपथविधीवर उदयनराजेंचे भाष्य

स्वत: उदयनराजे यांनी देखील यावर आज प्रतिक्रिया दिली असून सभागृहात तसे काहीही झालेले नाही असे सांगितले आहे. केवळ राजकारण होत असल्याचे आरोप उदयनराजे यांनी केले आहे. “मी शपथ घेतली, मी सांगतो आहे असे काहीही झालेले नाही. छत्रपतींचा अपमान झाला असता आणि मी गप्प बसलो असतो का? गप्प बसणाऱ्यांपैकी नाही हे सर्वांना माहिती आहे” असे उदयनराजे यांनी सांगितले आहे.

Copy