शिवराम पाटील यांच्या उपोषणाला मिळाला न्याय

0

धरणगाव । रस्ते बांधकामासंबंधी विविध मागण्यासाठी शिवराम पाटील व त्यांचे सहकारी धरणगाव तालुक्यातील नांदेड येथे दोन दिवसापासून उपोषणाला बसले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता ए.जे. पाटील यांनी संबंधित चार रस्त्यांपैकी तीन रस्त्यांचे सद्य स्थितीचे कागदपत्र उपोषणस्थळी आणुन दाखविल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. नांदेड ते धावडा रस्त्याची डांबरीकरणाचे कामाचे आदेश मक्तेदार एल.एच. पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला 25 नोव्हेबर 2016ला दिलेले आहे. 2.4 किलोमिटर रस्त्यासाठी 42 लाख 59 हजार 358 रूपयाचा निधी मंजूर आहेत. मात्र काम न करता निधी हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी केले आहे. संबंधीत काम दुसर्‍या ठेकेदाराकडून करण्याची मागणी अभियंता पाटील यांनी मान्य केली. उपोषण कर्त्यांना भाजपाचे जितेंद्र महाजन यांनी रस पाजले त्यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.

तीन लाखाचा गंडा
नांदेड ते नारणे रस्त्याचे 4 किलो मिटर डांबरिकरणाची तांत्रीक मंजूर मिळालेली आहे. नांदेड ते साळवा रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव पाठवलेला आहे. तो मंजूर होऊन काम चालू होईपर्यंत दुरूस्ती करण्याचे मान्य करण्यात आले आहे. हा रस्ता मागील वर्षी बनावट कागदोपत्री दुरूस्ती दाखवून तीन लाख अपहार झाल्याचे उघडकिस आले आहे.

रस्ता झेडपी
बाभुळगांव ते नारणे रस्त्यासाठी शेती अधिग्रहित केल्याची यादी उपोषण कर्त्यांनी मागितली असता अभियतांनी दहा दिवसात यादी देण्याचे लेखी पत्र दिले होते. अभियंता ए. जे. पाटील सह कार्यकारी अभियंता आणि आंदोलनकर्त्यांकडून शिवराम पाटील, डॉ सरोज पाटील यांच्याशी चर्चा केली. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या ताब्यात असल्याचे उपोषण कर्त्यांना सांगण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वी झाले आहे. आता काम पुर्ण करण्याची अपेक्षा उपोषण कर्त्यांनी व्यक्त केली.