शिवरथ यात्रेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवाना

0

चाळीसगाव । छत्रपती शिवाजी महाराजांचा हिदुस्थानातील पहिला भव्य दिव्य मानाचा पालखी सोहळा याचे आयोजन 3 ते 7 फेब्रुवारी 2017 किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असे केले आहे. या शिवरथ यात्रेसाठी चाळीसगाव येथून सह्याद्री प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिलीप घोरपडे यांचे सह प्रतिष्ठानचे मावळे रायगड कडे दि 3 फेब्रुवारी रोजी रवाना झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन दिलीप घोरपडे कृ बा चे माजी सभापती रमेश विक्रम चव्हाण संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ आदी मान्यवरांच्या हस्ते करून मावळ्यांनी शिवरथ यात्रेसाठी प्रस्थान केले.

यात्रेसाठी दिलीप घोरपडे यांचे सह प्रकाश नायर, शुभम चव्हाण, पप्पू राजपूत, शरद पाटील, अजय जोशी, रवींद्र सूर्यवंशी, योगेश शेळके, विनोद शिंपी, किरण घोरपडे, सचिन देवरे, सचिन घोरपडे, अजय घोरपडे, गौरव घोरपडे, धनंजय देशमुख, प्रणव कुडे, निखिल गायकवाड, ओम गायकवाड, मुन्ना पगार आदी रवाना झाले आहेत. त्यांचे स्वागत येथील तहसील कार्यालय समोर रमेश चव्हाण, लक्ष्मण शिरसाठ, मुराद पटेल, आरिफ खाटीक, विजय गायकवाड, राहुल सोनवणे आदी मान्यवरांनी केला.