शिवपूर कन्हाळ्यात विवाहितेची आत्महत्या

भुसावळ : आजाराला कंटाळून 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे शनिवारी सकाळी 10.30 वाजेपूर्वी घडली. मनीषा नितीन महाजन (22, कन्हाळा बु.॥) असे मयताचे नाव आहे. मनीषा महाजन यांची पहिली मुलगी मयत झाल्यानंतर त्यांना मोठा मानसिक आघात झाला होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. आजारामुळे नैराश्य आल्याने त्यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजेपूर्वी पन्हाळी पत्र्याच्या अँगलला झोक्याच्या दोरीने गळफास घेतला. या प्रकरणी तालुका पोलिसात उत्तम बाबूराव महाजन (60, कन्हाळा बु.॥) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण आदींनी भेट दिली. तपास सहा.निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.