शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारूविरूद्ध धडक कारवाई

0

भुसावळ : तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीवरून तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे धडक कारवाई करीत तब्बल एक हजार 300 लीटर कच्चे रसायन जागेवर नष्ट करीत सुमारे 48 हजार रूपयांचा
मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हिरू बुध्दू गवळी (रा.कन्हाळा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक केली.

60 लीटर गावठी दारू जप्त
शिवपूर कन्हाळा येथे गावठी हातभट्टीची दारू तयार केली जात असल्याची माहिती डीवायएसपी गजानन राठोड व निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत ड्रमवर कुर्‍हाडीचे घाव मारून दारू तयार करण्याचे कच्चे रसायन जमीनदोस्त केले. यात एक हजार 300 लीटर दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले. यावेळी पोलिसांनी गुळ, महू, नवसागर, पत्री ड्रम आणि 60 लीटर तयार गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. पोलिस निरीक्षक कुंभार यांच्यासह सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहीम शेख, अजय माळी, प्रदीप इंगळे यांनी ही कारवाई केली.

Copy