शिवजयंतीपर्यंत छत्रपतींचा पुतळा बसविण्याची मागणी

0

भुसावळ : शहरात 19 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महारांजाचा अश्वारुढ पुतळा नियोजीत जागी बसविण्याचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. हा पुतळा शिव जयंतीपर्यंत बसविण्यात यावा यासाठी शिवप्रेमींनी शनिवार 31 रोजी शिवप्रेमींनी नगराध्यक्षांना निवेदन दिले. छत्रपतींचा पुतळा नियोजीत जागी बसविण्यात यावा यासाठी शहरात अनेकदा आंदोलने झाली. 2 जून 2016 रोजी शहरात भव्य मोर्चा काढून नगराध्यक्षांना सुचित करण्यात आले होते. नगराध्यक्ष, नगरसेवक व हिंदूत्ववादी संघटनांच्या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना भेटून या संदर्भात निर्णय प्रक्रिया व्हावी अशी मागणी केली होती. 6 महिने उलटून देखील या कामात दिरंगाई होत आहे. याप्रकरणी पाठपुरावा करुन शिव पुतळा नियोजीत स्थळी शिघ्र बसविण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने नगराध्यक्षांना निवेदन देवून करण्यात आली.

विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांची उपस्थिती
याप्रसंगी नगराध्यक्ष भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेते मुन्ना तेली यांनी निवेदन देणार्‍यांचे म्हणणे ऐकून सकारात्मक चर्चा केली. या निवेदनावर प्रशांत जुवेकर, हितेश टकले, अभिजीत मराठे, तुषार सर्जेकर, पंकज मोटे, ईश्वर सर्जेकर, उमाकांत शर्मा, रितेश जैन, सुनिल धनवट, अक्षय पाटील, खुशाल वराडे, रोहित कोलते, उमेश जोशी आदी विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.