‘शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार’ मिळवण्यासाठी शासनाची फसवणूक ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

Cheating the government to get the ‘Shiva Chhatrapati Sports Organizer Award’; Crime against nine persons जळगाव : शासनाचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी संगनमत करीत खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी नऊ संशयीतांविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात फारुख शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्ण्यात आला. विशेष म्हणजे शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार 2016-2017 मध्ये मिळवून शासनाची फसवणूक करण्यात आली हे विशेष !

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
फारुख शेख यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 2003 ते 2016 च्या दरम्यान, प्रदीप कशोर प्रभाकर तळवेलकर (रा. शिवप्रभात, 38 जिल्हापेठ, निम- स्वातंत्र्य चौक) यांनी स्वत: तसेच ला.ना.हायस्कुलचे क्रीडा शिक्षक प्रशांत राजाराम जगताप (रा.एल 17/ए महाविर नगर, विकास दुध फेडरेशन जवळ, जळगाव), डॉ.बी.पी. खिवसरा (प्राचार्य एन.एस.एस.एम. धंतोली, नागपुर), अशोक दुधारे (रा.पोखर पॅलेस, पोखर कॉलनी, दिंडोरी रोड, नाशिक), डॉ.उदय डोंगरे (रा. मुक्तांगण, रो.हाऊस क्र.03, जगतनेत्रा, प्लॉट क्र.33 नाथप्रांगण, इमरलद सिटीच्या मागे, शिवाजी रोड, औरंगाबाद), डॉ. ए.एम.पाटील (शारीरीक शिक्षक, शारीरीक शिक्षण महाविद्यालय, डॉ.मुं.जे. मार्ग धंतोली, नागपूर), एल.आर. मौर्य (325, एच.गल्ली क्रमांक पाच, बाप्पा नगर, करोल बाग, नवी दिल्ली), श्रीकांत थोरात (रा.सिख मोहल्ला जिल्हा न्यायालयाजवळ, इंदौर म.प्र.), प्रा.आसीफ खान अजमल खान (क्रीडा संचालक, गोदावरी इंजिजिअरिंग कॉलेज, जळगाव) आणि प्रा.डॉ.देवदत्त पाटील (क्रीडा संचालक रा.कै.नानाभाऊ एम.टी.पाटील आर्टस् कॉलेज, मु.पो. मारवड, ता.अमळनेर) यांनी आपसात संगनमत करीत कट रचून प्रदीप प्रभाकर तळवेलकर यांना शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार 2016-2017 चे मानकरी- पुरस्कार मिळवून देण्यात खोटी व बनावट कागदपत्रे सादर करीत शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी 420, 120 ब सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.