शिवचरित्र वक्तृत्व स्पर्धेत 187 स्पर्धकांचा सहभाग

0

भुसावळ । येथील अंतर्नाद प्रतिष्ठान व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील म्युनिसिपल हायस्कूल येथे पार पडलेल्या शहरस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तीन गटात एकूण 187 विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून शिवचरित्र गायले.

मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धा
गटशिक्षणाधिकारी विजय पवार, शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण, मुख्याध्यापिका मायादेवी गोल्हाईत, ज्ञानेश्‍वर घुले, प्रभाकर नेहेते, रमाकांत भालेराव यांच्या उपस्थितीत वक्तृत्व स्पर्धेला प्रारंभ झाला. त्याआधी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. शैलेंद्र महाजन, प्रकल्प प्रमुख देव सरकटे व समन्वयक डॉ. जगदीश पाटील यांनी स्पर्धेची भूमिका मांडली. आभार अमित चौधरी यांनी मानले.

यांनी पाहिले परिक्षकांचे काम
स्पर्धेत शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील 187 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन गटात ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत परिक्षक म्हणून प्र.ह. दलाल, प्रा. नरेंद्र महाले, सुनिल वानखेडे, सीमा भारंबे, प्रा. ए.पी. पाटील, ज्योती बेलसरे, गायत्री सरोदे, मीरा जंगले, भाग्यश्री भंगाळे, उदय जोशी, रवींद्र पाटील, निवृत्ती पाटील, आनंद सपकाळे, पौर्णिमा राणे, हृषीकेश पवार, क्रांती वाघ यांनी काम पाहिले. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना स्मृतीचिन्ह, रोख पारितोषिक दिले जाणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील, प्रकल्प प्रमुख देव सरकटे, समन्वयक डॉ.जगदीश पाटील, अमित चौधरी, नियोजन समिती सदस्य ज्ञानेश्वर घुले, प्रा. भाग्यश्री भंगाळे, प्रा. श्रीकांत जोशी,संजू भटकर, प्रा. शाम दुसाने, निवृत्ती पाटील, प्रा. पंकज पाटील, प्रा. निलेश गुरूचल, अतुल चौधरी, अमितकुमार पाटील, संजय ताडेकर, प्रा. समाधान पाटील, राजू वारके, यांनी परिश्रम घेतले.