शिरसोली परिसरात आढळला वृध्दाचा मृतदेह

0

जळगाव । जळगाव तालुक्यातील भादली येथील 65 वर्षीय वृध्दाचा मृतदेह जैन हिल्स येथील शेततळ्यात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, आजाराला कंटाळून वृध्दाने आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तालुक्यातील भादली येथील रहिवासी चावदस राघो पाटील (वय 65) यांचे शिरसोली रस्त्यावरील जैन हिल्स परिसरात शेत आहे. या शेतात शेततळा असून या ठिकाणी आज चावदस राघो पाटील यांचा मृतदेह आढळुन आला.

आजाराला त्रासून आत्महत्त्या केल्याचा अंदाज
चावदस पाटील हे गेल्या काही महिन्यापासून आजाराला त्रासून गेले होते. त्यामुळेे आज सकाळच्या सुमारास शेततळ्यात स्वत:हाला झोकुन देवून आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही घटना त्यांना जेवणाचा डबा घेवून जाणार्‍या तरुणाच्या लक्षात आल्याने त्याने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती कळविली. यावेळी त्यांना शेततळ्यातून काढून दुपारी 3.50 वाजेच्या सुमारास प्राथमिक तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पिसाळलेल्या कृत्र्याचा दोघांना चावा
जळगाव- मोकाट कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. यातच आज देखील पुन्हा दोन जणांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून दोघांवर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहे. शहरातील नेहरु नगर परिसरातील प्रशांत बर्‍हाटे व यावल तालुक्यातील सावखेडा येथील उमांकात सुकलाल साळवे या दोघांना कुत्र्याने लचके तोडून गंभीर जखमी केले.