शिरसोलीतील वेल्डींग कारागिराची आत्महत्या

जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील 50 वर्षीय व्यक्तीने मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीला आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय नारायण मिस्त्री (50, रा.शिरसोली, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
संजय नारायण मिस्त्री (50) हे वेल्डिंग मिस्तरी चे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. बुधवार, 24 नोव्हेंबर रोजी रात्री कुटुंबीयांसह जेवण करून ते वेल्डिंगच्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन झोपले. दरम्यान, मध्यरात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार गुरुवारी सकाळी त्यांचा लहान मुलगा नितीन हा पाणी तापवण्यासाठी हिटर लावण्यासाठी गेला असता उघड झाला. मिस्त्री यांनी आत्म्हत्या केल्याचे पाहताच कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी सविता व राकेश आणि नितीन हे दोन मुले तर विवाहित मुलगी प्रियंका असा परीवार आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Copy