शिरसोलीजवळ धावत्या रेल्वेतून पडून युवक गंभीर जखमी

0

जळगाव । चाळीसगाव येथील रहिवासी 22 वर्षीय तरुण धावत्या रेल्वेतुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना अकराच्या सुमारास घडली. जळगाव शहरातील तांबापुरा येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी येतांना शिरसोली रेल्वेस्थानका जवळ हा तरुण धावत्या एक्सप्रेस गाडीतून खाली कोसळला. चाळीसगाव येथील रहिवासी तरुण परवेज शेख ऊर्फ मुन्ना शेख अय्युब (वय-22) हा जळगाव येण्यासाठी सकाळी घरुन निघाला होता.

रेल्वेने गाडीत बसल्यावर शिरसोली जवळ धावत्या रेल्वेतुन फेकला गेल्याने डोक्याला, छातीला, नाकाला गंभीर दुखापत झाली असुन 108 ऍम्बुलन्सने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉ.विजय कुरकूरे यांनी प्रथमोपचार केल्यावर पोलिसासंमक्ष त्याची अंगझडती घेण्यात आली, कुठलाच पुरावा कागद पाकीट काहीही मिळून आले नाही मात्र त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलवरुन त्याच्या कुटूंबीयांना फोन वर माहिती दिली.