Private Advt

शिरसोलीजवळ अपघात; गोंडगाव येथील तरुण ठार

एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद

जळगाव । नातेवाईकाचे अंत्यविधी आटोपून जळगावकडून भडगावकडे जात असलेल्या गोंडगाव येथील मोटारसायकल स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो शिरसोलीजवळ जागीच ठार झाला.
संतोष रमेश पाटील (वय 36 , रा. गोंडगाव, ता. भडगाव ) हा नातेवाईकांसह जळगावला एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी आलेला होता. अंत्यविधी आटोपल्यानंतर सर्वजण पुन्हा भडगावकडे घरी जाण्यासाठी निघाले.
संतोष पाटील हा तरुण मोटारसायकलवर होता. तर काही नातेवाईक क्रूझर गाडीने पुढे निघाले होते. अज्ञात वाहनाने शिरसोलीजवळ मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात संतोष पाटील जागीच ठार झाला. या अपघाताबाबत कळताच शिरसोली ग्रामस्थ आणि एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संतोष पाटील याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी जाहीर केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.