Private Advt

शिरसमणीत बंद घरातून चोरट्यांनी 97 हजारांची रोकड लांबविली

भुसावळ/पारोळा : तालुक्यातील शिरसमणी येथे घराचे कुलूप तोडून घरातून 97 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळत ठेवून चोरीचा संशय
संभाजी शिवाजी पाटील (शिरसमणी, ता.पारोळा) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शनिवार, 25 डिसेंबर रोजी रात्री 11 ते 26 डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरातील सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक तोडून आत प्रवेश करत घरातील 97 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विजय भोई करीत आहेत.