Private Advt

शिरपूर शहरातील एकाची गिधाडे पुलावरून उडी घेत आत्महत्या

शिरपूर : तालुक्यातील गिधाडे येथील पुलावर दुचाकी उभी करून तापी नदी पात्रात दूध डेअरी कॉलनीमधील 40 वर्षीय व्यक्तीने उडी घेत केली आत्महत्या केली. ही बुधवारी सकाळी उघडकीस आली. पुष्पराज अशोक पटेल (40, दूध डेअरी कॉलनी, शिरपूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शिरपूर शहरातील दूध डेअरी कॉलनी मध्ये राहणार्‍या पुष्पराज अशोक पटेल यांनी बुधवारी सकाळी गिधाडे येथील तापी नदी पुलावर होंडा कंपनीची सीडी डीलक्स (एम.एच.18 एक्स.1274( क्रमांकाची दुचाकी उभी करून नदी पात्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी नदी पात्रात पट्टीच्या पोहणार्‍यांकडून शोध घेतला दुपारी दिड वाजेच्या वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला. मृतदेह गुजर खर्डे येथील नातेवाईक निलेश लिलाचंद पाटील यांनी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला असता डॉ.गुलाबराव पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले. या प्रकरणी वार्डबॉय प्रवीण पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.