शिरपूर येथे करवंद नाका शाखेत ग्राहक मेळावा

0

शिरपूर। शहरातील जाणता राजा काँप्लेक्स करवंद नाका शाखेत ग्राहक मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ग्राहकांना मार्गदर्शन करण्यासाठी व विविध समस्या समजून घेण्यासाठी धुळे जिल्हाचे ए.जी.एम. रवी नायडू, जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बुध, रमेश गोयल मँनेजर ट्रेझरी शाखा धुळे, महेश बागड रीजनल ऑफीस डेप्युटी मँनेजर, राकेश मिश्रा मॅनेजर मुख्य शाखा शिरपूर, नंदकिशोर लाटणे मॅनेजर करवंद नाका शाखा, या अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.

या वेळेस ज्या ग्राहकांना बँकेच्या व्यवहारा विषयी अडचणी होत्या.त्यांनाही त्या सम्बंधित माहीती देण्यात आली. करवंद नाका शाखेचे मॅनेजर श्री लाटणे व त्यांचा स्टाफ ग्राहकांना सेवा देण्यास नेहमी तत्पर असतात. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी कामकाज पाहिले.